श्रीगोंदा तहसीलदारांची अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यावर कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरानजीक वन विभागाच्या हद्दीमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर श्रीगोंदा तहसीलदारांनी कारवाई करून एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर, अशी दोन वाहने तहसील कार्यालयात आणून लावली.

मात्र, याकारवाईबाबत अधिक माहिती विचारली असता, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी दिगंबर पवार यांनी माहिती न देता माहिती दडविण्याचा प्रकार केल्याने तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी केलेल्या कारवाईबाबत शंका निर्माण होत आहे.

श्रीगोंदा शहरापासून काही अंतरावर वनविभागाच्या हद्दीमध्ये शेकडो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन तसेच वाहतूक होत असल्याची माहिती काही नागरिकांनी श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना देत उत्खनन करणारी तसेच वाहतूक करणारी वाहने त्यांच्या ताब्यात दिली.

वाहने ताब्यात घेऊन वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात आणली. मात्र, या घटनेला चार पाच दिवस उलटूनदेखील कारवाईबाबत माहिती मिळाली नाही. याबाबत तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागातील क्लार्क दिगंबर पवार यांनी कारवाईबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत माहिती देण्याआगोदर

तहसीलदार मैडम यांना विचारावे लागत असल्याचे सांगितले. तहसील कार्यालयाकडून या कारवाईबाबत नागरिकांकडून शंका निर्माण होत आहे. याबाबत तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना अधिक माहिती विचारण्यासाठी संपर्क केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe