Maharashtra News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्याचे काम पूर्ण झाले असून सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरीदरम्यानच्या २५ किमीचा रस्ता फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
नागपूर आणि शिर्डीदरम्यानच्या ५२० किमी लांबीचे लोकार्पण डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शिर्डी आणि भरवीरदरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, समृद्धी महामार्गावर वाहनांच्या ओव्हरब्रिजचे गर्डर टाकण्याचे काम शिल्लक आहे. २५ किमी लांबीची इतर सर्व मोठी कामे पूर्ण झाली आहेत.
महामार्गादरम्यान २५ किमीवर उड्डाणपूल, व्हीओबी, प्रत्येकी ३०० मीटरचा दुहेरी बोगदा आणि जुना मुंबई-नाशिक महामार्ग क्रॉसिंगचा आराखडा आहे. समृद्धी महामार्ग, नागपूर ते मुंबईला जोडणारा ७०१ किमीच्या मार्गापैकी इगतपुरीतील भरवीर ते नागपूर हा ६०० किमीचा द्रुतगती मार्ग सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. या मार्गाचे दोन टप्प्यांत उद्घाटन करण्यात आले.
नागपूर आणि शिर्डीदरम्यानच्या ५२० किमी लांबीचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शिर्डी आणि भरवीर दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
हा २५ किमीचा रस्ता सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्याचे काम पूर्ण होणार असून केवळ ठाणे जिल्ह्याचे काम शिल्लक राहणार आहे. ७६ किमीचा उर्वरित भाग पूर्ण करून जुलैपर्यंत हा मार्ग खुला करण्याचे विचाराधीन आहे.