Maharashtra News : ओबीसी समाज संघटित झाला असून, मराठा समाजाचे आरक्षणातील अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाहीत. यापुढील काळात आमरण उपोषण करण्याऐवजी साखळी उपोषण करुन प्रशासनाला जागे करू
आता एकच पर्व आणि ओबीसी सर्व हीच खुणगाठ मनाशी बाळगा व एकोपा कायम राहू द्या, असे आवाहन ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी केले.
येथील स्व. वंसतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर नागनाथ गर्जे यांनी गेली पाच दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण केले. ओबीसी नेत्यांच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित करण्यात आले.
अॅड. गुणरत्न सदावर्ते व टि.पी. मुंडे यांच्याशी व्हीओडीओ कॉलवर नागनाथ गर्जे यांचे बोलणे खेडकर यांनी करुन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
गर्जे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखळ करण्यात आले आहे. या वेळी दिलीपराव खेडकर, संभाजीराव पालवे, आदिनाथ महाराज आंधळे, गोकुळभाऊ दौंड, किसनराव आव्हाड, रमेश सानप, अनिल निकम, सुधाकर आव्हाड, भोरू म्हस्के, अरविंद सोनटक्के, नवनाथ चव्हाण, विकास नागरगोजे,
कृष्णा पांचाळ, प्रल्हाद किर्तने, मनिषा किर्तने, शिला किर्तने, कांता किर्तने, गिता किर्तने, ताराबाई किर्तने, सुभाष केकाण, दत्ताभाऊ खेडकर विमल किर्तने, चंद्रभागा किर्तने यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.
पाच दिवस नागनाथ गर्जे यांनी उपोषण केले. गर्जे यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना पोटात दुखण्याचा जास्त त्रास झाल्याने उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, शुक्रवारी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गजें यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
मते यांनी उपोषण थांबवावे, अशी प्रशासनाच्या वतीने विनंती केली. दिलीपराव खेडकर यांनीही गजें यांना उपोषण थांबवावे, असा सल्ला दिला. या वेळी मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. त्यांना ओबीसीमध्ये घेऊ नये. आमच्यावर अन्याया करू नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करू असा सुरु उपोषणकत्यांनी जाहीर केला. किसनराव आव्हाड यांनी आभार मानले.