Mahashivratri Tips : महाशिवरात्री दिवशी करा हे उपाय ! विवाहाच्या मार्गातील अडचणी होतील दूर…

Ahmednagarlive24 office
Published:
Mahashivratri Tips

Mahashivratri Tips : देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक हिंदू धर्मीय लोक भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करत असतात.

हिंदू धर्मातील नागरिकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस खूप खास असतो. या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे देशभरात महाशिवरात्री साजरी केली जाते.

महाराशिवरात्री दिवशी व्रत करणे, भगवान शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते. तुम्हीही या दिवशी काही उपाय केले तर तुमचा विवाह लवकरच होण्याची शक्यता असते. विवाहाच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील.

विवाहाच्या मागतील अडचणी दूर करण्यासाठी करा हे उपाय

विवाहाच्या मार्गात अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस खास ठरू शकतो. महाशिवरात्री शिवलिंगावर दूध आणि तूप अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतील. पार्वतीला लाल रंगाचे कपडे, केशरी सिंदूर अर्पण करा. त्यामुळे लवकर लग्न जमण्याची शक्यता आहे.

मुलींनाही लग्नात अडचणी येत असतील तर काळजी करू नका. महाशिवरात्रीदिवशी पार्वतीला मेहंदी लावा आणि तीच मेहंदी हातावर लावा. जर तुम्ही असे केल्यास तुमच्या लग्नातील अडचणी दूर होतील.

भगवान शंकराला चंदनाची पेस्ट आणि फुले अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतील. तसेच महाशिवरात्रीला तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान करून तुम्ही पूजा करा.

गरजू मुलीला पिवळी साडी, बेसनाचे लाडू आणि तांदूळ दान केल्याने तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील. तसेच महाशिवरात्रीदिवशी मुलींनी उपवास करणे फायद्याचे ठरू शकते.

भगवान शंकरासमोर देशी तुपाचा दिवा लावा. महाशिवरात्रीदिवशी मुलींनी मंदिरात जाऊन अभिषेक करा असे केल्याने तुमचा विवाह लवकर जमेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe