7th Pay Commission Breaking : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! इतका वाढणार DA, थकबाकीही मिळणार

Ahmednagarlive24 office
Published:
7th Pay Commission Breaking

7th Pay Commission Breaking : देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी घोषणा केली जाऊ शकते. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीची घोषणा या महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यात 4 टक्के DA वाढीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील मोठी वाढ होणार आहे.

वर्षातून दोन वेळा DA वाढ केली जाते

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. मात्र या नवीन वर्षातील पहिली DA वाढ अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट दिले जाऊ शकते.

सरकारकडून DA सोबत DR वाढ देखील दिली जाईल. जानेवारी ते जून यादरम्यान पहिली DA वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर दरम्यान दुसरी DA वाढ केली जाते. या चालू महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना वर्षातील पहिली DA वाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

DA मध्ये होणार 4 टक्के वाढ

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकडून कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. जर आता 4 टक्के DA वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने DA वाढ दिली जाईल.

DA थकबाकी मिळेल

कर्मचाऱ्यांना या मार्च महिन्यात DA वाढ दिली गेली तरी जानेवारी महिन्यापासून DA वाढीचा लाभ दिला जाईल. मागील दोन महिन्यांची DA थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना दिली जाईल. दोन महिन्यांची DA थकबाकी मार्च महिन्याच्या पगारात दिली जाण्याची शक्यता आहे.

किती कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा लाभ मिळणार

देशातील 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडून DA वाढ केली तर 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe