Chandra Grahan 2024 : 2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 25 मार्च रोजी होणार आहे. या चंद्रग्रहणाचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. काही राशींवर या चंद्रग्राहकांचा चांगला प्रभाव पडणार आहे तर काही राशींवर त्याचा वाईट परिणाम देखील होणार आहे.
खालील राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव

मेष
मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चंद्रग्रहण चांगले ठरू शकते. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्य देखील चांगले राहील. नोकरी करत असाल तर पगारात चांगली वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल तसेच नफा देखील चांगला होईल.
वृषभ
वृषभ राशीवर देखील चंद्रग्रहणाचा सकारात्मक प्रभाव पडेल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सामान्य राहील. नोकरी करत असलेल्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. नवीन ओळख निर्माण कराल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना चंद्रग्रहण आर्थिक लाभ होण्याचे संकटे देत आहे. व्यवसायात यशस्वी व्हाल. तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. नोकरीत सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना चंद्रग्रहण यशाचे संकेत देत आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात देखील तुम्हाला चांगले यश मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या चंद्रग्रहणाचा वाईट प्रभाव पडणार आहे. मानसिक आणि शारीरिक तणाव जाणवू शकतो. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार होईल. नवीन जोखीम टाळणे फायद्याचे ठरू शकते.
धनु
धनु राशीच्या लोकांना चंद्रग्रहण परदेश प्रवास आणि विस्ताराचे संकेत देता आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. प्रवासात काळजी घेण्याची गरज आहे. नोकरीमध्ये चांगले यश मिळेल. व्यवसायात परदेशी ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळेल.