आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या – डॉ.सुजय विखे पाटील

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : निळवंडे धरण होऊ न देण्याबरोबरच पाणी बंद करण्याचा आरोप ज्या कुटुंबावर झाले, त्यांच कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ना. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते निळवंडे कालव्याना पाणी सोडण्याचा बहुमान मिळाला.

त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.आश्वी (ता. संगमनेर) येथे ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य वाटप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विखे बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिद्र थेटे, भगवान इलग, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, रोहिणी निघूते, माधव गायकवाड, निवृत्ती सांगळे,

भाऊसाहेब जऱ्हाड, अजय ब्राम्हणे, पोपटराव वाणी, विजय चतुरे, गीताराम तांबे, शांताराम जोरी, शिवाजी इलग, बबनराव काळे, दिनकर गायकवाड, सरूंनाथ उंबरकर, गोकुळ दिघे, अशोक म्हसे, संदीप घुगे, विजय म्हसे यांच्यासह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व बचत गटातील महिला उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याला आतापर्यंत अनेक पालकमंत्री मिळाले. परंतु ही पहिली वेळ आहे की, जिल्हा नियोजन निधीतून बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून दीड कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. जिल्ह्यात अनेक मंत्री झाले, परंतु भाषणापलिकडे जाऊन महिलांना ताकत देण्याचा व सक्षम करण्याचा विचार झाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe