FD News : जेव्हा-जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा निश्चितच मुदत ठेव (FD) चे नाव समोर येते. मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे आणि तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. सर्वोत्तम FD दर ऑफर करणाऱ्या बँका विविध घटकांवर आणि FD च्या विशिष्ट कालावधीनुसार व्याजदर देतात. तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
आज आम्ही तुम्हाला कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक, पंजाब अँड सिंध बँक, आरबीएल बँक, डीसीबी बँक यांचे एफडीदर सांगणार आहोत.
गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की बँका एफडीवरील व्याजदर कधीही बदलतात. अशा परिस्थितीत, गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला एफडी दरांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
13 बँकांचे सर्वोत्तम एफडी दर :-
RBL बँक – 8.10 टक्के (18 महिने ते 24 महिने)
DCB बँक – 8 टक्के (25 महिने ते 26 महिने)
इंडसइंड बँक – 7.75 टक्के (1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी, 1 वर्ष 6 महिने ते 1 वर्ष 7 महिन्यांपेक्षा कमी, 1 वर्ष 7 महिने ते 2 वर्षे)
IDFC फर्स्ट बँक – 7.75 टक्के (549 दिवस – 2 वर्षे)
येस बँक – 7.75 टक्के (18 महिने आणि 24 महिने)
पंजाब आणि सिंध बँक – 7.40 टक्के (444 दिवस)
कोटक महिंद्रा बँक – 7.40 टक्के (390 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी)
पंजाब नॅशनल बँक – 7.25 टक्के (400 दिवस)
बँक ऑफ बडोदा – 7.25 टक्के (2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत)
HDFC बँक – 7.25 टक्के (18 महिने ते 21 महिने)
ICICI बँक – 7.20 टक्के (15 महिने ते 18 महिने कमी)
ICICI बँक – 7.20 टक्के (18 महिने ते 2 वर्षे)
ॲक्सिस बँक – 7.20 टक्के (17 महिने ते 18 महिने)
SBI – 7 टक्के (2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी)
बँक ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण
जर तुम्ही बँकेचे ग्राहक असाल, तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की जर तुमची बँक डिफॉल्ट झाली किंवा दिवाळखोर झाली तर तुम्हाला बँक ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. DICGC ही कंपनी संपूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मालकीची आहे, ती देशातील बँकांचा विमा करते.