Senior Citizen : जसे-जसे वय वाढते, तसे सेवानिवृत्तीचे वय जवळ येते, जेव्हा एखादा व्यक्ती सेवानिवृत्तीचे वय गाठते तेव्हा सहसा आपल्या बचतीवर जगत. अशास्थितीत चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी निवृत्त झाल्यावर मोठ्या पैशांची गरज असते.
दरम्यान, आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत खाते आहे. जी शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यामध्ये इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज मिळते.
आम्ही पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीमबद्दल बोलत आहोत, याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये तुमची 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते आणि निवृत्तीनंतर तुमच्या पैशाच्या गरजाही पूर्ण होतात.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची पात्रता?
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी आहे. किंवा ज्यांनी वयाच्या 55 व्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे परंतु त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे. ते VRS अंतर्गत खाते उघडू शकतात. याशिवाय सेवानिवृत्त संरक्षण सेवेतील कर्मचारी वयाच्या 50 व्या वर्षीही खाते उघडू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतही हे खाते उघडू शकता.
असा करा अर्ज
ज्येष्ठ नागरिक कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये SCSS खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना किमान 1000 रुपये आणि कमाल 30 लाख रुपये जमा करावे लागतील. खात्यात 1,000 च्या पटीत पैसे जमा केले जाऊ शकतात. ती 30 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.
परतावा
ही योजना 8.2 टक्के वार्षिक व्याज देत आहे. जर एखाद्या व्यक्तीने सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 2.46 लाख रुपये वार्षिक व्याज मिळेल, जे दरमहा सुमारे 20,000 रुपये आहे.