Horoscope 4 March : सावधान ! या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, अन्यथा….

Horoscope 4 March : मार्च महिना सुरु होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. अशातच या महिन्यात चंद्रग्रहण देखील होणार आहे. त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांचा अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहे. काही राशीच्या लोकांना आज काळजी घेण्याची गरज आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांना आज काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुमचा कोणाशी वाद झाल्यास तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो. कामे करताना आळशी होऊ नका. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज जवळच्या व्यक्तींकडून त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. व्यवसायात प्रगत होईल. थकवा जाणवेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जुन्या आठवणी ताज्या होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना आज ग्रहस्थिती निर्माण होत असल्याने नियम मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयीन ठिकाणी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. कोणतीही औषधे घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस खराब असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस तुमच्यावर रागवेल. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी वाद टाळावा. खाद्यपदार्थाचा व्यवसायात फायदा होईल. मसालेदार पदार्थ खाऊ नका पोटाच्या समस्या निर्माण होतील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. शिक्षण आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज पाय दुखण्याची शक्यता आहे.

व्यवसायात जोडीदार असेल तर त्याच्याशी समन्वय राखा. त्याच्यापासून काहीही लपवू नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेण्यास आळशी होऊ नका अन्यथा त्रास होईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज सकारात्मक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुसंवाद वाढवण्याची गरज आहे. व्यवसायात नवीन सुरुवात करण्यासाठी आर्थिक अडचणी येतील मात्र तुमचे कार्य पूर्ण होईल. घरून काम करणाऱ्यांनी इतरांशी संपर्क साधावा. गंभीर आजारामुळे औषधे घेत असाल तर ती घ्यायला विसरू नका.

तूळ

तूळ राशींच्या लोकांना आज डोळ्याच्या समस्या निर्माण होतील. तणावामुळे नोकरी सोडण्याचा विचार घातक ठरू शकतो. मित्र आणि पत्नीकडून तुम्हाला सहकार्य लाभेल. शिवलिंगावर लाल रंगाची फुले अर्पण करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज बॉसशी चांगले संबंध ठेवावे लागतील. तुमचा बॉस तुमच्यावर रागावला असेल तर त्याच्याशी संवाद साधने गरजेचे आहे. व्यवसायात प्रगती होईल. अनेक दिवसांपासून असलेल्या आजारातून सुटका मिळेल.

धनु

भगवान शंकराची पूजा केल्याने तुमचे सर्व अडथळे पूर्ण होतील. रखडलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर काळजी घ्या. दुःखदायक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. तसेच तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

मकर

नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी येऊ शकतात. तुमच्या व्यवसायात तुम्ही समाधानी असाल. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही त्यांनी घरी बसून अभ्यास करावा. कानाशी संबंधित समस्या निर्माण होतील.

कुंभ

कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्तीच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना मेहनत करण्याची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहा.

मीन

मिन राशीच्या लोकांना आज सौम्य वाणीचा वापर करावा लागेल. कोणतेही मोठे व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. हार्डवेअर व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे.