खासदार सुजय विखे पाटील यांच्या ‘त्या’ विधानामुळे जिल्ह्यात खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:

“जनतेची कामं जे करतील अशा कार्यकर्त्यांच्या हस्तेच मी सत्कार स्वीकारेन. मला हार तुरे आणणारे नको. तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या. आपल्यावर नेहमीच आरोप होतात.

आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही आमच्या विरोधाकांना अपमानीत करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण कराल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची ही शिकवण नाही”, अशा शब्दांत सुजय विखेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

राहाता शहरात महिला बचत गटाला साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपांना मी दोन महिन्यांनी उत्तरं देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे.

शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे (शिर्डी) येईन. काळजी करू नका”, असं वक्तव्य केल्याने सुजय विखेंना नेमकं म्हणायचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासदार सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळणार नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशात आता त्यांनी या सभेत हे वक्तव्य केलं आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe