Nagar Parishad Chakan Bharti : चाकण नगर परिषद, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असला तर ही संधी उत्तम आणि चांगली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, पाहूया…
चाकण नगर परिषद, पुणे अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
![Nagar Parishad Chakan Bharti](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/03/Nagar-Parishad-Chakan-Bharti.jpg)
वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक असेल. शहर समन्वयक पदासाठी उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून, बी.ई/बी.टेक (कोणतीही शाखा), बी.आर्क, बी. प्लॅनिंग, बी.एस्सी (कोणतीही शाखा) झालेला असावा.
यासाठी वयोमर्यादा देखील आहेत, येथे 35 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. या पुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय, चाकण या पत्त्यावर पोस्टाने 04 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तसेच तुम्हाला यासंबंधित अधिक माहिती हवी आसल्यास अधिकृत वेबसाईट https://pune.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 असून,
विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-तरी इच्छुक व पात्रउमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.