Ahmednagar News : चितळी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतील टप्पा २ च्या निधीतून चितळी-बऱ्हाणपूर, या चार कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उध्दव महाराज ढमाळ होते.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, चारुदत्त वाघ, पोपटराव कराळे, संभाजी राजळे, राधाकिसन राजळे, कृष्णा महाराज ताठे, उध्दव महाराज जाधव, सरपंच अशोक आमटे, अशोक ताठे, महादेव जायभाये, सदस्य बाबा आमटे, विनायक ताठे,
अनिल ढमाळ, विष्णुपंत ताठे, अजिनाथ आमटे, अंकुश राजळे, शिवाजी खोजे, अर्जुन राजळे, ज्ञानदेव तुपे, भगत साहेब, तुषार तुपे, उमेश तिजोरे, सोपान तुपे, अंकुश राजळे, राधाकिसन गोपीनाथ राजळे, ज्ञानदेव जगताप, संभाजी राजळे, दत्तात्रय शेळके, साहेबराव सातपुते, कैलास आमटे, सुनिता आमटे, सरला आमटे उपस्थित होते.
या वेळी बोलताना राजळे म्हणाल्या, चितळी गाव व परीसरातील जनतेने आम्हाला सातत्याने मदतीचा हात दिलेला आहे. मधल्या काळात निधी देताना अडचणी आल्या. आता सरकार आपले असल्याने निधी देता आला. स्मशानभूमी व आणखी काही कामे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. नमो अॅपचे काम तातडीने युवकांनी करावे.
पक्षाला वेळ द्या, पक्ष आपल्याला सरकारच्या योजना देत असतो. तुम्ही पक्षसंघटनेत सामील व्हा. आता पक्षाच्या उमेदवाऱ्या संघटेनच्या मजबुती करणावर मिळतील, असे राजळे म्हणाल्या.
सरपंच अशोकराव आमटे यांनी गावाच्या विकासाला सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राजळे यांची पेढेतुला केली. सरंपच आशोकराव आमटे यांनी प्रास्ताविक केले. अशोक ताठे यांनी सूत्रसंचालन केले. ताठे सर यांनी आभार मानले.