Jio Recharge Plan : देशातील टेलिकॉम क्षेत्रामध्ये सध्या अनेक कंपन्या आहेत. मात्र रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. करोडो ग्राहक जिओची सेवा टेलिकॉम सर्व्हिसचा फायदा घेत आहेत. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन देखील स्वस्त आहेत.
कमी किमतीमध्ये ग्राहकांना रिलायन्स जिओकडून शानदार प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिओकडून दररोज नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करण्यात येत आहेत. तुम्हीही या प्लॅनचा फायदा घेऊन पैशांची बचत करू शकता.
रिलायन्स जिओकडून 84 दिवसांची वैधता असलेले अनेक प्लॅन बाजारात सादर केले आहेत. मात्र सर्वात स्वस्त 395 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांची वैधतेसह उपलब्ध आहे. तुम्हालाही तुमच्या फोनसाठी 395 रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम आहे. या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला दररोज फक्त 5 रुपये खर्च येईल.
रिलायन्स जिओचा 395 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या ग्राहकांना 395 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन अगदी उत्तम ठरेल. या प्लॅनमध्ये 6GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 1,000 SMS सर्व नेटवर्कवर विनामूल्य देण्यात येत आहेत. तुमचा 6GB डेटा संपल्यानंतर वेग कमी होऊन इंटरनेट 64Kbps पर्यंत चालेल.
जिओच्या 84 दिवसांच्या प्लॅनचे फायदे
रिलायन्स जिओचे जे ग्राहक तीन महिन्यांचा प्लॅन शोधत असतील त्यांच्या 395 रुपयांचा प्लॅन खास आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त इतर फायदे देखील दिले जात आहेत. Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा देखील फायदा ग्राहक घेऊ शकतात. तुमच्या परिसरात 5G असेल तर तुम्ही अनलिमिटेड 5G सर्व्हिसचा फायदा घेऊ शकता.
जिओचा 299 रुपयांचा प्लॅन
जिओ टेलिकॉम कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 28 दिवसांची वैधता असलेला 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 2 GB डेटा प्रमाणे एकूण 56 GB डेटा देण्यात येत आहे.
तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची सुविधा देखील दिली जात आहे. दररोज 100 मोफत एसएमएस देखील दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सुविधा देखील मोफत दिल्या जात आहेत.