OnePlus 11R Discount : देशातील मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांकडून त्यांचे शानदार स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये OnePlus चा देखील खूप मोठा वाटा आहे. OnePlus कडून अनेक महागडे स्मार्टफोन बाजारात सादर करण्यात आले आहेत.
OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण OnePlus च्या एका शानदार स्मार्टफोन बंपर ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही देखील ऑफरचा लाभ घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता.
OnePlus कडून त्यांच्या 11R स्मार्टफोनवर 3000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. वनप्लस 11R स्मार्टफोन गेल्या वर्षी सादर करण्यात आला आहे. OnePlus 11R स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत असल्याने तुम्ही सहज हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
OnePlus 11R डिस्काउंट ऑफर
OnePlus 11R 8GB रॅम आणि 128GB स्मार्टफोन कंपनीकडून 39,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र या OnePlus 11R 8GB रॅम आणि 128GB व्हेरियंटवर 2000 रुपयांची सूट देण्यात येत असल्याने तुम्ही हा स्मार्टफोन 37,999 रुपयांना खरेदी करू शकता.
तसेच OnePlus 11R स्मार्टफोनच्या 16GB + 256GB व्हेरिएंटची लाँच किंमत 44,999 रुपये आहे मात्र कंपनीकडून आता या व्हेरियंटवर 2000 रुपयांची सूट देण्यात येत असल्याने त्याची किंमत 41,999 रुपये झाली आहे.
OnePlus 11R स्मार्टफोनवर ICICI बँक आणि OneCard क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. ही सूट OnePlus च्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर देण्यात येत आहे.
OnePlus 11R ची वैशिष्ट्ये
OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट देण्यात आली आहे. 16GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह हा फोन सादर करण्यात आला आहे.
OnePlus 11R स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, त्यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी पॅक दिला आहे.