Ahmednagar News : रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांना अटक झाली नाही, तर आम्हाला सर्वाना आत्महत्येची परवानगी देण्यात यावी, आम्हाला आता त्रास आणि छळ सहन होत नाही,
आमच्या सर्व मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा महाविद्यालयाच्या सुमारे ४०० विद्यार्थी-विद्यार्थीनींनी दिला आहे.
या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनसुरू केले आहे.मोरे हे मुलीचा शारीरिक पिळवणूक व त्यांना ब्लॅकमेल करतात. पहिल्या वर्षांपासून शेवटच्या वर्षापर्यंत, सत्याची बाजू घेतल्यामूळे मानसिक त्रास देतात.
स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टीमुळे आम्हाला तीन तास कॉलेजमधून उशिरा सोडले जाते. कॉलेज ४ ला सुटले तर ६ ला सोड़ले जाते. आमच्याकडून १५ हजार देऊन सहल काढत आहे.
जर फी नसेल तर गुण देण्यात येणार नाही, कागदपत्रांची मागणी केली तर पैसे मागितले जातात. विद्यार्थिनीं चा शारिरीक मानसिक छळ करतात. काही सांगितले, तर तुम्हाला इंटरनल गुण देणार नाही व नापास करण्यात येईल असा दम देतात.
मागील विद्यार्थिनींचाही विनयभंग करण्याचा प्रकार झाला होता, याविरोधात अर्ज केले असता मोरे संबधितांना बोलावून त्यांना दमबाजी करून त्यांना पोलिस ठाण्यातून माघारी अर्ज घ्यायला भाग पाडले जाते.
या महाविद्यालयाला अधिकृत प्राचार्यही नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केल्या. यातील एका विद्याथ्यनि मोरे यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. कुलगुरू जोपर्यंत येत नाही तो पर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी संबंधित संस्थेच्या अध्यक्ष यांना बोलावून चौकशी करण्यात येईल, कुलगुरू यांना निवेदन पाठवले जाईल, असे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले. दरम्यान, मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.