CNG Price Cut : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण CNG वाहने खरेदी करत आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत CNG च्या किमती कमी असून CNG वाहने पेट्रोल- डिझेल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहेत.
तुमच्याकडे CNG कार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण CNG च्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. सरकारी महानगर गॅस (MGL) ने CNG च्या नवीन किमती जारी केल्या आहेत.
MGL कडून CNG च्या किमती कमी केल्या आहेत. CNG च्या किमतीमध्ये प्रति किलो 2.5 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या आहेत. देशात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी CNG च्या किमती वेगवेगळ्या आहेत.
सीएनजीचे भाव का कमी झाले?
MGL कडून CNG च्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. गॅस इनपुट कॉस्टमध्ये झालेली घट लक्षात घेता CNG च्या दरात कपात करण्यात आली आहे. काल 5 मार्च रोजी कंपनीकडून CNG चे दर कमी करण्यात आल्याचे सांगितले आहे. आजपासून CNG चे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलच्या किमतीच्या तुकनेत CNG ची किंमत 53 टक्के स्वस्त झाली आहे. त्याचवेळी डिझेलपेक्षा CNG 22 टक्के स्वस्त झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
सीएनजीच्या किमती कमी करून काय फायदा होणार?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये अनेक महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. CNG च्या दरात कमी केल्याचा फायदा नैसर्गिक वायूचा वापर वाढण्यास होणार आहे. दिल्लीत प्रति किलो CNG ची किंमत 76.59 रुपये आहे.
मुंबईत सध्या एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे तर डिझेलची प्रति लिटरची किंमत 94.27 रुपये आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.