7th Pay Commission Breaking : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांनी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या भेटवस्तू दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारकडून याबाबत काम सुरु करण्यात आले आहे.
मोदी सरकारकडून देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 मोठे गिफ्ट देण्याची तयारी करत आहे.
होळीपूर्वी महागाई भत्ता वाढवणार
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के DA वाढ दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चालू महिन्यात 25 मार्च रोजी होळी आहे.
होळीपूर्वीच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा लाभ दिला जाऊ शकतो. सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के DA दिला जात आहे. मात्र 4 टक्के DA वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा DA 50 होईल. याचा फायदा 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
HRA-TA भत्ते देखील वाढतील
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना DA वाढीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र यासोबतच कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता आणि TA देखील वाढवला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा HRA 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या TA देखील वाढवला जाऊ शकतो.
फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार केला जाऊ शकतो
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यावरून 3 टक्क्यावर जाऊ शकतो.