भाजपाचा गेम फसणार ! महायुतीला फक्त ‘एवढ्या’ जागांवर मिळणार विजय; बीजेपी, अजितदादा अन शिंदे गटाला किती जागा ? चकित करणारा ओपिनियन पोल

Tejas B Shelar
Updated:
Maharashtra Lok Sabha Opinion Poll

Maharashtra Lok Sabha Opinion Poll : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभेच्या तारखा जाहीर करेल असे बोलले जात आहे. तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. अशा परिस्थितीत, आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवार फायनल करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षाने आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट नव्हते. यावरून सध्या महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागा वाटपावरून अंतिम निर्णय झालेला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

तथापि काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेतलेल्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानुसार भाजपा 32 जागांवर निवडणूक लढवण्यास ठाम असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, उर्वरित जागांवर 10 जागा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला, 3 जागा अजित दादा यांच्या गटाला जाण्याची शक्यता आहे आणि उर्वरित जागेवर कमळ चिन्हावर शिंदे यांच्या गटातील आणि अजितदादा यांच्या गटातील उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

अशातच मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याबाबतचे ओपिनियन पोल देखील समोर येऊ लागले आहेत. इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा ओपिनियन पोल देखील नुकताच समोर आला आहे.

या ओपिनियन पोलने मात्र महायुतीसहित महाविकास आघाडीमध्ये चांगलीच खळबळ माजवली आहे. या ओपिनियन पोलने भाजपाच्या मनसुब्यावर देखील पाणी फेरले आहे. चला तर मग आता वेळ न दवडता जाणून घेऊया या ओपिनियन पोलची सविस्तर आकडेवारी.

काय म्हणतोय ओपिनियन पोल ?

या ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळणार आहेत. भाजपा, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजितदादा गट राष्ट्रवादी यांच्या महायुतीने महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागांवर विजयी पताका फडकवण्याचा निर्धार केला आहे. पण, महायुतीच्या या मनसुब्यावर आता पाणी फेरले गेले आहे.

कारण की, India TV-CNX Opinion Poll ने भाजप 25, एकनाथ शिंदे यांचा गट सहा आणि अजितदादा यांचा गट चार जागा जिंकणार असा दावा केला आहे. म्हणजेच महायुतीला आगामी निवडणुकीत 35 जागा मिळतील असा अंदाज या ओपिनियन पोलने मांडला आहे.

2019 मध्ये मात्र भाजप आणि शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. अर्थातच या निवडणुकीत सहा जागा महायुतीला गमवाव्या लागू शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीला आगामी लोकसभेत फक्त 13 जागा जिंकता येतील असा दावा या पोलने केला आहे.

महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेना सर्वाधिक म्हणजे 8 जागा जिंकू शकते, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा आणि काँग्रेसला 2 जागांवरच विजय मिळेल असा या पोलमध्ये अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, हा एक ओपिनियन पोल आहे. यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि निकालानंतरच महाविकास आघाडी आणि महायुतीचे भवितव्य कळू शकणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe