Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Content Team
Published:
Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत.

मुंबई विद्यापीठ, अंतर्गत “संचालक, थिएटर आर्ट्स अकादमी, प्राध्यापक, संगणक विज्ञान विभाग, प्राध्यापक, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, आर्थिक अर्थशास्त्र (RBI) मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पब्लिक पॉलिसीचे प्राध्यापक, राजकीय अर्थशास्त्र (RBI) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरचे प्राध्यापक मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी”. पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 21 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि आपले अर्ज सादर करा.

अर्ज शुल्क

वरील पदांसाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य असेल, सामान्य उमेदवारांसाठी हे शुल्क 500/- रुपये तर राखीव उमेदवारांसाठी शुल्क 200/- रुपये इतके आहे.

निवड प्रक्रिया मुलाखती

ही भरती मुंबईत होत असून, उमेदवारांची यासाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट www.mu.ac.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.

-अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे, ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत. तसेच अर्ज 21 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe