Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याचे रूंदीकरण व साईडपटी काम व्हावे म्हणून मागील बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे. नगर सोलापूर नवीन बायपास रस्त्याचे काम झाले.
मात्र येथील बायपास रस्ता ते उकरी नदी रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने खा. विखे, आ.राम शिंदे यांना देखील भाजपाचे नेते संपत बावडकर यांनी रस्त्याचे काम व्हावे, म्हणून मागणी केली होती.
त्याअनुषंगाने खा. विखे व आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून वन टाइम इम्प्रूमेंटमध्ये जुना हायवे बसविण्यात आला आहे. नगर सोलापूर हा नवीन रस्ता चालू असताना मिरजगावच्या शेजारून बाह्यवळण गेल्यामुळे मिरजगाव शहराच्या अंतर्गत व लगत असणारे जुन्या हायवे रोडची दयनीय अवस्था झाली.
नुकतेच नगर या ठिकाणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेच्या दरम्यान संपत बावडकर यांनी उकरी नदी ते नवीन रस्ता व मिरजगाव भारत विद्यालय – बोरुडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी व माहिजळगावचा जुना बायपासबाबत लक्ष वेधले होते.
खा. विखे व आ. शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नातून नितीन गडकरी यांनी वन टाइम इम्प्रूमेंटला मान्यता दिली असून काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात खा. विखे यांनी अधिकाऱ्यांना या कामासंदर्भात चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.
याबाबत मंत्री गडकरी यांच्या कार्यक्रमात या प्रस्तावांना मान्यता घेऊ असे आश्वासन दिले होते. त्या प्रस्तावित कामाला आता गती मिळणार असुन हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीन सोयीचा होणार आहे. नागरिकांच्या मागणीला यश आल्याने खा. विखे व आ. शिंदे यांचे नागरिकांमधून आभार मानले जात आहे.
नगर – सोलापूर जुन्या रस्त्याचे काम मंत्री गडकरी यांच्या माध्यमातून खा. सुजय विखे व आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून होत असल्याने आमची मागणी व पाठपुराव्याला नक्कीच यश मिळाले आहे.
तसेच रस्त्याचे काम देखील सुरू झाल्याने या रस्त्याचे रूंदीकरण व साईडपट्याची काम होणार असल्याने मिरजगावकरांच्यावतीने दोन्ही लोकप्रतिनिधीचे मनःपूर्वक आभार. – संपत बावडकर, भाजपा नेते