Shrigonda Politics : आ. बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त स्नेहभोजनाच्या माध्यमातून आपल्या अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे.
या स्नेह भोजनाच्या निमित्ताने काष्टी येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब शेलार यांच्यासह
अनेक मातब्बर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आ. पाचपुते यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आ. पाचपुते यांनी नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा काष्टीत आयोजित केला होता. या मेळाव्याला मतदार संघासह मिरजगाव गटातील जुन्या नव्या अश्या ४० ते ४५ हजार कार्यकर्त्यांनी भेट दिली असल्याचे चर्चिले जात आहे.
आ. बबनराव पाचपुतेंनी बोकडांचे जेवण…
५० वर्षात काय विकास केला याचा आढावा घेणे गरजेचे होते आ. पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला मात्र या ५० वर्षात काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होतनव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा.
आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे हे लक्षात घ्यावे. – साजन पाचपुते, उपनेते शिवसेना (उद्धव बा. ठाकरे)
आ. पाचपुते यांनी चितपट करण्याची तयारी पूर्ण
कितीही स्नेहमेळावा घेतला तरी मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत आ. पाचपुते यांनी चितपट करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पाचपुते निवडणुकीच्या रिंगणात येण्याची वाट पाहत आहेत. – बाळासाहेब नाहटा, अध्यक्ष, राज्य बाजार समिती सभापती
५० वर्षात आ. पाचपुते आणि परिवाराने फक्त भ्रष्टाचार केला
मागील ५० वर्षात आ. पाचपुते आणि परिवाराने फक्त भ्रष्टाचार केला. जातीचे राजकारण करत करत मतविभाजन करून लाभ घेतला. त्या माध्यमातून हवेली बांधली, कॉलेज उभारले, कारखाना उभारला मात्र डिंबे माणिक डोह बोगदा,
साकळाई, बिबटे सफारी पार्क, तालुक्यातील रस्ते, औद्योगिक वसाहत यासारख्या अनेक विकासकामांवर ठोस काम करता आले नाही. ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त काय काम केले याचा पाचपुते कुटुंबाने खुलासा करावा. टिळक भोस, बीआरएस नेते