भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन

Published on -

Ahmednagar News : भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनातील पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त ७ क्रमांकाचे मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

रब्बी हंगामातील उशिरा पेरणी झालेला गहू व हरभरा यासह ऊस, मका व इतर पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने धरणातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी कालवा सल्लागार समितीकडे करण्यात आली होती.

त्यानंतर आज गुरुवार (दि.७) मार्चपासून धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातील पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे ७ क्रमांकाचे मागणी अर्ज नोंदविणे आवश्यक आहे.

नोंदणी केलेल्या मागणीनुसार शेतकऱ्यांना पाणी देण्याचे धोरण असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे नोंदवून घ्यावेत,

तसेच मंजूर असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठीचे साठवण तलाव भरून घ्यावेत, याबाबत काही अडचण आल्यास आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. कानडे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News