राज्यात कोणत्या पक्षाचे किती खासदार ? 2019 मध्ये कोणी मारली होती बाजी, पहा संपूर्ण यादी

Tejas B Shelar
Published:
Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. येत्या 16 जूनला 17व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत, लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. निवडणुक आयोग लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.

या अनुषंगाने निवडणुकीची संपूर्ण तयारी देखील निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. राजकीय पक्षांनी देखील आता आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनी आता आपले उमेदवार अंतिम करून त्यांची यादी देखील सार्वजनिक करण्यास सुरवात केली आहे.

भाजपाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी आपली पहिली यादी सार्वजनिक केली आहे. विशेष म्हणजे उर्वरित उमेदवारांची यादी देखील भाजपा लवकरच जाहीर करणार आहे. भाजपा समवेतच इतर पक्षांच्या माध्यमातून देखील लवकरच आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी पुढे आणली जाणार आहे.

यामुळे सध्या देशात विविध राजकीय घडामोडी पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील 48 खासदारांची यादी थोडक्यात जाणून घेणार आहोत. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात कोणी विजयश्री मिळवला आहे याविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसा होता 2019 चा निकाल 

2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याची किमया साधली होती. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्षला 1 जागा मिळाली होती 

राज्यातील 48 खासदारांची यादी

नंदुरबार : हिना गावित (बीजेपी)

धुळे : डॉक्टर सुभाष भामरे (बीजेपी)

जळगाव : उन्मेष पाटील (बीजेपी)

रावेर : रक्षा खडसे (बीजेपी)

बुलढाणा : प्रतापराव जाधव ( सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गटात)

अकोला : संजय धोत्रे (बीजेपी)

अमरावती : नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)

वर्धा : भाजपाचे रामदास तडस 

रामटेक : शिंदे गट शिवसेना कृपाल तुमाणे 

नागपूर : भाजपाचे नितीन गडकरी

भंडारा गोंदिया : भाजपाचे सुनील मेंढे

गडचिरोली चिमूर : भाजपाचे अशोक नेते

चंद्रपूर : बाळू धानोरकर काँग्रेसचे विजयी झाले होते सध्या ही जागा रिक्त आहे.

यवतमाळ वाशिम : शिंदे गटातील भावना गवळी

हिंगोली : हेमंत पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील

नांदेड : भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर

परभणी : उबाठा शिवसेना पक्षाचे संजय जाधव

जालना : भाजपाचे रावसाहेब दानवे

औरंगाबाद : वंचित बहूजन पक्षाचे इम्तियाज जलील

दिंडोरी : भाजपचे भारती पवार

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या गटातील हेमंत गोडसे

पालघर : एकनाथ शिंदे यांच्या गटातील राजेंद्र गावित

भिवंडी : भाजपाचे कपिल पाटील

कल्याण : एकनाथ शिंदे यांच्या गटातील श्रीकांत शिंदे

ठाणे : राजन विचारे उबाठा शिवसेना

मुंबई उत्तर : भाजपाचे गोपाळ शेट्टी

मुंबई उत्तर पश्चिम : एकनाथ शिंदे यांच्या गटातील गजानन कीर्तिकर

मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व ) : भाजपाचे मनोज कोटक

मुंबई उत्तर मध्य : भाजपाच्या पुनम महाजन

मुंबई दक्षिण मध्य : एकनाथ शिंदे यांच्या गटातील राहुल शेवाळे

दक्षिण मुंबई : ठाकरे गटातील अरविंद सावंत

रायगड : अजित पवार गटातील सुनील तटकरे

मावळ : शिंदे गटातील श्रीरंग बारणे

पुणे : भाजपाचे गिरीश बापट सध्या ही जागा रिक्त आहे

बारामती : शरद पवार यांच्या गटातील सुप्रिया सुळे

शिरूर : शरद पवार यांच्या गटातील अमोल कोल्हे

अहमदनगर : भाजपाचे सुजय विखे पाटील

शिर्डी : एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदाशिव लोखंडे

बीड : भाजपाचे डॉक्टर प्रीतम मुंडे

उस्मानाबाद : ठाकरे गटातील ओमराजे निंबाळकर

लातूर : भाजपा पक्षाचे सुधाकरराव श्रंगारे

सोलापूर : भाजपाचे जय सिद्धेश्वर स्वामी

माढा : भाजपाचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर

सांगली : भाजपाचे संजय काका पाटील

सातारा : शरद पवार गटातील श्रीनिवास पाटील

रत्नागिरी सिंधुदुर्ग : ठाकरे गटातील विनायक राऊत

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्या गटातील संजय मंडलिक

हातकणंगले : एकनाथ शिंदे यांच्या गटातील धैर्यशील माने 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe