Numerology : लग्न करण्यास इच्छुक नसतात ‘या’ मुली, प्रियकरापासून लांब पाळतात…

Ahmednagarlive24 office
Published:
Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रह, कुंडली नक्षत्र महत्वाची भूमिका निभावतात, व्यक्तीच्या जन्मापासूनच कुंडली तयार केली जाते, कुंडलीच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, जशा की, वर्तमान, भविष्य, इत्यादी.

त्याचप्रमाणे, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार देखील व्यक्तीबद्दल खूप काही जाणून घेता येते, ज्याप्रमाणे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते त्याचप्रमाणे, अंकशास्त्र देखील व्यक्तीबद्दल खूप काही सांगते.

अंकशास्त्र, ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा, यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेद्वारे भविष्याबद्दल माहिती देते, तसेच व्यक्तिमत्व आणि भविष्याचे मूल्यमापन देखील जन्मतारखेद्वारे केले जाते. आज आपण अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जन्मतःच खूप खास असतात. आपण मूलांक 7 बद्दल जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रात जन्मतारखेची बेरीज करून जी संख्या येते तिला मूलांक संख्या असे म्हणतात.

मूलांक 7

महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ मूलांक संख्या 7 असते. हा क्रमांक केतू ग्रहाच्या मालकीचा आहे. या नंबरच्या मूलांक संख्येच्या मुली कशा असतात जाणून घेऊया.

-केतू ग्रहाच्या प्रभावामुळे 7 क्रमांकाच्या मुली खूप भाग्यवान असतात.

-या मुलींना समाजात मोठे स्थान आणि प्रतिष्ठा मिळते.

-या मुली थोड्या गंभीर स्वरूपाच्या असतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या लव्ह लाईफमध्ये अडथळे निर्माण होतात.

-या मूलांकाच्या मुली लग्नापासून पळून जातात आणि लग्न करू इच्छित नाहीत.

-त्यांच्या आयुष्यात प्रेम येते, पण त्या नात्याचे लग्नात रूपांतर त्यांना करायचे नसते. अनेकवेळा यामुळे नात्यात तडा जातो.

-ज्याच्याशी ते प्रेमात पडतात. जर त्यांनी त्या व्यक्तीशी लग्न केले तर त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाते.

-ते खूप हुशार आहेत आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसे कमावतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe