Numerology : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली, नक्षत्र यांना विशेष महत्व आहे. व्यक्तीच्या जन्मापासूनच त्याची कुंडली तयार केली जाते. कुंडली जन्म वेळ, जन्म ठिकाण आणि ग्रहांच्या स्थितीनुसार तयार केली जाते. कुंडलीच्या आधारे व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात, जसे की, भविष्य वर्तमान आणि वागणूक इत्यादी.
व्यक्तीबद्दल वैयक्तिक माहिती फक्त कुंडलीच्या आधारेच नाही तर अंकशास्त्राद्वारे देखील सांगितली जाते. अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातील एक महत्वाची शाखा आहे. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे सर्वकाही सांगितले जाते.
ज्योतिष हे एक शास्त्र आहे जे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याशी संबंधित सर्व माहिती देते. नवग्रहांच्या स्थितीच्या आधारे, राशीनुसार कोणाबद्दलही सर्व काही कळू शकते. त्याचप्रमाणे जन्मतारीख देखील जीवनाबद्दल अनेक खुलासे करते.
अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे जे जन्मतारखेनुसार गणना करते. यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेपासून मूलांक संख्या मिळवून त्याच्या स्वभावासह त्याच्या आयुष्याविषयी आणि भविष्याविषयी सर्व काही जाणून घेता येते. आज जाणून घेऊया काही खास तारखांना जन्मलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत.
मूलांक क्रमांक 2
महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या मुलींची मूलांक संख्या 2 असते. आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल जाणून घेणार आहोत.
-या तारखेच्या जन्मलेल्या मुली खरं तर ती शांत स्वभावाच्या आणि सध्या दिसतात. पण प्रत्यक्षात त्या खूप हुशार असतात.
-या तारखांना जन्मलेल्या मुली स्वभावाने अतिशय शांत असतात..
-त्यांची हुशारी त्यांना संपत्ती जमा करण्यास मदत करते. हे लोक पैसे गोळा करण्यात माहिर असतात.
-त्या हुशार जरी असल्या तरी त्यांचे मन अत्यंत स्वच्छ आहे.
-अशा मुली इतरांना मदत करण्यापासून कधीही मागे हटत नाही आणि नातेसंबंध चांगले कसे टिकवायचे हे तिला माहित आहे.