UPSC Recruitment : पदवीधरांसाठी सुवर्ण संधी! UPSC अंतर्गत 325 पदांसाठी भरती सुरु…

Published on -

UPSC Recruitment : केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये वैयक्तिक सहाय्यक पदासाठी भरती निघाली असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठीची भरती अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत, आणि यासाठी पात्रता काय असेल? जाणून घेऊया….

वरील भरती अंतर्गत एकूण 325 रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी, सर्वसाधारणसाठी 132, AC साठी 48, ST साठी 24, OBC साठी 87, EWS साठी 32 आणि PWDB उमेदवारांसाठी 12 जागा रिक्त आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 संध्याकाळी 6:00 पर्यंत आहे. जर तुमच्या अर्जामध्ये काही चुका आढळल्या तर सुधारणा विंडो 28 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 पर्यंत खुली करण्यात येईल. या काळात तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता. लक्षात घ्या परीक्षेची तारीख 7 जुलै 2024 आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा

वैयक्तिक सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही विषयात पदवीधर असणे अनिवार्य आहे. सर्वसाधारणसाठी विहित केलेली वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 30वर्षे आहे. OBC साठी कमाल वयोमर्यादा 33 वर्षे आहे. SC-ST साठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आणि PWD साठी 40 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया आणि वेतन

या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. तर नियुक्तीनंतर, लेव्हल 7 (7 CPC) अंतर्गत पगार 44,900 रुपयांपर्यंत असेल.

अशा प्रकारे करा अर्ज

सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 25 आहे. ST, SC, PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहेत. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज अर्ज करू शकता.

-सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.

-होमपेजवर UPSC EPFO ​​PA नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करा.

-अधिसूचनेखाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.

-आता अर्ज भरा. सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा.

-आवश्यक कागदपत्रे सबमिट करा आणि अपलोड करा.

-फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

-अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे ठेवा.

टीप : लक्षात घ्या अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News