Fixed Deposit : ‘ही’ बँक देतेय कमाई करण्याची उत्तम संधी, एफडीवरील व्याजदर आहेत खूपच खास…

Content Team
Published:
Fixed Deposit Interest Rate

Fixed Deposit Interest Rate : वयाच्या एका टप्प्यात येऊन पोहचल्यानंतर जेष्ठ नागरिकांकडे कोणतेही उत्पन्नाचे नसते, अशास्थितीत त्यांच्याकडे असलेली बचत ही त्यांच्या कामी येते, म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने नोकरीत असतातच भविष्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे, आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जी सध्या आपल्या एफडीवर सर्वाधिक परतावा ऑफर करत आहे.

ज्येष्ठ नागरिकांकडे असलेली सर्वात मोठी शक्ती ही त्यांची बचत आहे, म्हणून ते असे गुंतवणुकीचे मार्ग शोधतात जिथे त्यांना कमी जोखमीसह जास्त आणि हमखास परतावा मिळू शकेल. आम्ही अशाच एका FD चा पर्याय घेऊन आलो आहोत, जी सुरक्षेसह उत्तम परतावा देखील देत आहे.

अगदी तरुण ते ज्येष्ठ नागरिकही FD म्हणजेच मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एफडी हे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे उत्कृष्ट साधन आहे. सामान्यत: मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका एफडीवर जास्त व्याज देतात. अलीकडेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या निवडक मुदतीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 25 महिन्यांच्या FD व्याजदरात 0.41 टक्क्यांनी वाढ केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन व्याजदर 1 मार्च 2024 पासून लागू झाले आहेत.

या बदलानंतर आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर 4 टक्के ते 9.01 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 9.25 टक्के व्याजदर देत आहे. बँक 5 ते 25 कोटी रुपयांच्या स्लॅबमधील बचत खाते ग्राहकांना 7.75 टक्के व्याजदर देखील देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन एफडी दर

-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के
-15 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
-46 दिवस ते 90 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
-91 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 5.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.50 टक्के
-6 महिन्यांपेक्षा जास्त ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के
-9 महिन्यांपेक्षा जास्त ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
-1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.35 टक्के
-1 वर्षापेक्षा जास्त ते 15 महिने: सामान्य लोकांसाठी – 8.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 8.75 टक्के
-18 महिन्यांहून अधिकते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 8.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 9.00 टक्के
-2 वर्षांपेक्षा जास्त ते 2 वर्षे 1 दिवस: सामान्य लोकांसाठी – 8.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 9.10 टक्के
-2 वर्षे 2 दिवस: सामान्य लोकांसाठी – 8.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 9.10 टक्के
-2 वर्षे 3 दिवस ते 25 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 8.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 9.10 टक्के
-2 वर्षे 1 महिना (25 महिने): सामान्य लोकांसाठी – 9.01 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 9.25 टक्के

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe