Rajya Lokseva Hakka Aayog : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
या भरती अंतर्गत “गट अ” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
![Rajya Lokseva Hakka Aayog](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/03/Rajya-Lokseva-Hakka-Aayog.jpg)
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर, संगणकाचे ज्ञान, तसेच लेखापरिक्षणाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच गट-ब पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव पाहिजे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 59 ते 63 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
अर्ज पद्धती
ऑनलाईन (ई-मेल) अर्ज [email protected] येथे पाठवायचा आहे तर ऑफलाईन अर्ज ‘राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, ७ वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई- ४०००३२’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित सविस्तर माहिती https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे, उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करायचे आहेत.