उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भाजपाचे नवीन पर्व सुरु होणार, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे तिकीट कापणार ?

Published on -

North Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत, भारतीय निवडणूक आयोग आता 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका घेतल्या जातील अन नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. त्यामुळे आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष यंदाच्या निवडणुकीत कोणाला तिकीट दिले पाहिजे यावर मंथन करत आहेत. अशातच आता उत्तर महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्ष नॉर्थ महाराष्ट्र मध्ये एक नवीन पर्व सुरू करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात भाजपाचे नवीन पर्व सुरू होणार अशा चर्चा आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील रावेर या दुसऱ्या लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे खासदार म्हणून काम पाहत आहेत. जर जळगावमधून पुन्हा एकदा पाटील यांना उमेदवारी मिळाली तर ही त्यांची दुसरी टर्म राहणार आहे. दुसरीकडे जर रावेर मधून खडसे यांना उमेदवारी मिळाली तर ही त्यांची तिसरी टर्म राहील.

मात्र सध्या राजकीय वर्तुळात या दोन्ही जागेवर भाजपा आपला उमेदवार बदलणार असल्याचा चर्चा आहेत. जर भाजपाने असा निर्णय घेतला तर हा एक मोठा इतिहास ठरेल. कारण की, बीजेपीकडून जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन्ही लोकसभा जागेवरील उमेदवारांचे तिकीट कापले गेलेले नाही. 1914 मध्ये भाजपाने रावेर मधील तत्कालीन विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले होते.

मात्र जळगाव मधून एटी पाटील यांची उमेदवारी त्यावेळी कायम ठेवण्यात आली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकांबाबत बोलायचं झालं तर भाजपाने जळगाव मधील विद्यमान खासदार एटी पाटील यांना उमेदवारी नाकारली होती. गेल्या वेळी भाजपाने उन्मेष पाटील यांना तिकीट दिले. पाटील या जागेवरून विजयी झालेत आणि विद्यमान खासदार म्हणून काम पाहत आहेत.

दुसरीकडे रावेर मतदारसंघात गेल्या वेळी भाजपाने रक्षा खडसे यांचे तिकीट कायम ठेवले होते. आता मात्र भाजपा 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवरील उमेदवारांना तिकीट नाकारणार आणि नवीन उमेदवारांना तिकीट देणार अशा चर्चा सुरू आहेत. अजूनही भाजपाने महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र या चर्चा जर खऱ्या ठरल्या तर निश्चितच भाजपा जळगाव जिल्ह्यात आपल्या पक्षाचा एक नवा अध्याय लिहिणार आहे.

जळगावातून कोणाला संधी मिळणार ?

जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार-पाच टर्म पासून जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभेच्या जागांवर भाजपाचा उमेदवार विजयी होत आला आहे. उमेदवार जरी बदलत असली तरी देखील भाजपाची या दोन्ही मतदारसंघावर चांगली पकड आहे. पण आतापर्यंत या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान खासदारांचे एकाच वेळी तिकीट कापले गेलेले नाही. यंदा, म्हणजेच 2024 च्या लोकसभेत मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाकडून रावेर आणि जळगाव या दोन्ही जागेवरील विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

भाजपाने जर जळगाव मधून विद्यमान खासदारांचे तिकीट कापले तर यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले जिल्हा दूधसंघाचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत. दुसरीकडे या जागेवर माजी आमदार स्मिता वाघ यादेखील शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपाने या जागेवर उमेदवार बदलला तर वाघ की निकम कोणाला संधी मिळणार ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

रावेरमधून कोण निवडणूक लढवणार ?

रावेरमध्ये देखील भाजपा आपला उमेदवार बदलण्याच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. जर असे झाले तर यावेळी भाजपाकडून नुकत्याच पक्षात प्रवेश घेतलेल्या माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांची कन्या डॉक्टर केतकी महाजन यांना उमेदवारी बहाल करू शकते.

दुसरीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे देखील नाव या जागेसाठी चर्चेत आले आहे. जर महाराष्ट्र राज्य शासनात मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली तर पक्षातर्फे राज्यातील मंत्री लोकसभेची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. यामुळे, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागेवरील 2024 ची लोकसभा निवडणूकित भारतीय जनता पक्ष इतिहास घडवणार असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe