मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आला !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आल्याने गाव खेडी कामास विरोधकही दबक्या पावलाने हजेरी लावीत असल्याचा दावा आमदार काळे समर्थकांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी गाव खेड्यात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. हा विकास धुमधडाका पाहून विरोधक सुद्धा आता विकास कामांना दबक्या पावलाने हजरी लावीत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा दावा आ. काळे आहे.

महाराष्ट्रात दोन वेळा झालेल्या सत्तांतरामुळे दोन्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांचे समर्थक असलेल्या आमदार काळे यांना मोठा लाभ झाला. त्यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यश आले. परिणामी मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या रस्ते व विकास कामाना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून त्या समस्या सोडविण्यात आ. काळे यशस्वी झाले आहेत.

मतदार संघातील विकास कामांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले गाव, खेडी येथे विकासाच्या धुमधडाका सुरू केला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या विकास कामांना वेग आला आहे. अनेक कामांचा निधी मिळाला आहे.

अनेक मंजूरी व प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळवण्यात आ. काळे यांना यश आले आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात व कोपरगाव शहरात देखील कुठे रस्त्यांची कामे, कुठे शासकीय इमारती,

तर कुठे पाणी योजना अशा प्रकारे विविध विकासकामे सर्वत्र सुरू आहेत. कधी न झालेले रस्ते होत असल्यामुळे व आपल्या गावातील देखील रस्ता झाला, याचा नागरिकांना आनंद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe