खा.सदाशिव लोखंडेंच्या विकास कामांमुळे जनतेला दिलासा

Published on -

Ahmednagar News : खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध विकास कामे मार्गी लावून जनतेला मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.

खासदार लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून देवळाली प्रवरा ते दवणगाव रस्त्याच्या ४ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच चिंचोली ते देवळाली प्रवरा या दरम्यान ३ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचो भूमीपूजन व पिंपळगाव फुणगी येथील कामाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, देवळाली प्रवरा शहराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रशांत सदाशिव लोखंडे, ३२ गाव तालुकाप्रमुख सुनील कराळे आदींच्या हस्ते पार पडला.

कदम म्हणाले, की खासदार लोखंडे सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील आहेत. त्यांनी परिसरातील अनेक कामे लोकहितासाठी मार्गी लावली. आता या निवडणुकीत आपण त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.

जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते म्हणाले, की खासदार लोखंडे यांनी विकासकामांचा मोठा धडाका लावून विविध प्रश्न मार्गी लावले. आता या कामावर नागरिकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सत्यजित कदम यांनी खासदार लोखंडे हे विकासाकडे लक्ष केंद्रित करणारे नेतृत्व असल्याचे सांगितले.

दवणगाव येथे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुनील खपके, देवळाली शहर प्रमुख विक्रम फाटे, अशोकराव साळुंके, माजी सरपंच प्रदीप होन, सर्जेराव होन, सरपंच भाऊसाहेब खपके उपसरपंच भारत होन, चेअरमन अशोक कासार, अनिल खपके, धनंजय होन, शिवाजी खपके, संदीप जऱ्हाड, अनिल गाडेकर, सूर्यभान जऱ्हाड, कांतीलाल होन,

भाऊसाहेब साळुंखे, दादासाहेब खपके, सुरेश होन, सतीश पांडागळे, सुभाष खपके आदी उपस्थित होते. पिंपळगाव फुणगी येथे प्रा. सतीश राऊत, सरपंच शिवाजी जाधव, नारायण जाधव, जगन्नाथ वर्षे, दत्तू पारखे, उस्मान शेख, कृष्णा होळकर, गोरख नान्नोर, बाबासाहेब पठारे आदी उपस्थित होते.

चिंचोली येथे सरपंच शोभा लाटे, सुरेश लाटे, उपसरपंच शरद आरगडे, अशोक गागरे, बाळासाहेब लाटे, संजय राका, बाळासाहेब पारखे, भानू तात्या नलगे, दिलीप दाढकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

काम न करता कामाचे श्रेय लाटू बघणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेने जाब विचारला पाहिजे. खासदार लोखंडे यांनी कामे करायची आणि श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न आमदाराने करायचा, ही गोष्ट अशोभनीय असल्याचे प्रशांत लोखंडे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News