Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील हरवलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे होणारे हाल, याला जबाबदार आजचे लोकप्रतिनिधी आहेत. आजही तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच आहेत.
आजी-माजी आमदारांनी फक्त त्यांचे बगलबच्चे मोठे करण्याचे काम केले, अशी टीका मा. जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी केली. आज (दि.११) रोजी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने शेवगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विक्रम ढाकणे होते.
कार्यक्रमास अॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, राजू जिजा पातकळ, आबासाहेब काकडे, रज्जाक शेख, माणिक गर्जे, भागवत भोसले, देविदास गिहें, भिवसेन केदार, नवनाथ खेडकर, विष्णू गरड, बबन पवार, मनोज घोंगडे,
पृथ्वीसिंह काकडे, मनोज घनवट, सुनील गवळी, भागचंद कुंडकर, सुरेश चौधरी, चंद्रकांत काकडे, निवृत्ती चव्हाण, अशोक दातीर, गणपत फलके, रंगनाथ ढाकणे, शेषराव फलके, नारायण टेकाळे, मारुती पांढरे, भाऊसाहेब आव्हाड, अशोक दातीर, बाळासाहेब जाधव,
हरिभाऊ शेळके, सुनील दारकुंडे, राजेंद्र पोटफोडे, मल्हारी अडसरे, हरिश्चंद्र निजवे, नामदेव ढाकणे, शामराव खरात, रघुनाथ सातपुते, भगवान डावरे, गोटीराम वांडेकर, ज्ञानदेव कातकडे, आबासाहेब आहेर, विक्रम काकडे, विष्णू दिवटे, पंडितराव नेमाने, अकबर शेख,
राधाकिसन शिंदे, उमेश वाघ, नसीर बेग आदी उपस्थित होते. अॅड. काकडे म्हणाले की, तालुक्यातील प्रस्थापितांनी ताजनापूर प्रकल्पाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तरीदेखील आम्ही पाठ्पुरावा करून ताजनापूर लिफ्टचा प्रकल्प मंजूर करून घेतला.
त्यांनी जनतेला हक्काच्या पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवले. यांचे जनतेवरचे प्रेम त्यावेळी कुठे गेले होते, असे काकडे म्हणाले. सूत्रसंचालन दादासाहेब देवढे यांनी, प्रास्ताविक अशोकराव ढाकणे यांनी तर जगन्नाथ गावडे यांनी आभार मानले. या वेळी भाऊसाहेब सातपुते, माणिक गर्जे, अशोक पातकळ यांची भाषणे झाली.