NHM Pune Job 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल.
वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
पदवीधर उमेदवार यासाठी करण्यास पात्र असतील. तरी उमेदवारांनी पदांनुसार आपले अर्ज सादर करायचे आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा देखील ठेवण्यात आली आहे, उमेदवार 70 वर्षापर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.
ऑनलाईन अर्जाची लिंक
इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करून आपले अर्ज सादर करू शकतात.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज शुल्क देखील आकारले जात आहेत, येथे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200/- रुपये तर राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 300/- रुपये इतके शुल्क आहेत.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी (वैद्यकीय अधिकारी) उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास https://www.zppune.org/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी देय तारखे अगोदर आपले सादर करावेत.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे. तरी उमेदवारांनी अर्जासह महत्वाची कागदपत्रे जोडावीत. तसेच अर्ज शुल्क भरणे देखील गजेंचे आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जहिरात सविस्तर वाचा.