Realme Smartphones : रियलमी लॉन्च करत जबरदस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरासह असतील अनेक खास फीचर्स!

Ahmednagarlive24 office
Published:
Realme Smartphones

Realme Smartphones : रियलमी लवकरच आपला जबरदस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीने नुकताच Realme Narzo स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. टीझर नुसार हा फोन जबरदस्त फीचर्ससह मार्केटमध्ये एंट्री करणार असल्याचे दिसत आहे. तसेच हा फोन जर मार्केटमध्ये लॉन्च झाला तर मोबाईल मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होईल.

फोनचे लँडिंग पेज ॲमेझॉनवर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहे. आज, ब्रँडने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की Narzo 70 Pro 5G 19 मार्च रोजी देशात लॉन्च केला जाईल. चला या फोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

Realme Narzo 70 Pro 5G लाँच तारीख

कंपनीने पुष्टी केली आहे की Narzo 70 Pro 5G हा Sony IMX890 50 मेगापिक्सेलच्या प्राथमिक कॅमेरासह किंमत विभागातील पहिला स्मार्टफोन असेल. ब्रँडचा दावा आहे की फोनच्या मागील पॅनलमध्ये “Duo Touch Glass” डिझाइन आहे. जसे पाहिले जाऊ शकते, फोनच्या मागील शेलमध्ये ड्युअल-टोन फिनिशसह आर्क डिझाइन आहे.

Realme Narzo 60 Pro 5G ची किंमत

Realme Narzo 60 Pro 5G गेल्या वर्षी जुलैमध्ये 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आगामी स्मार्टफोन समान किंमतीच्या श्रेणीत येण्याची शक्यता आहे.

Realme Narzo 70 Pro 5G ची वैशिष्ट्ये

Realme Narzo 70 Pro 5G Android 14 वर आधारित Realme UI 5 वर चालेल. याशिवाय, यात अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. तसेच वापरकर्त्यांना उत्तम अनुभव मिळेल.

Narzo 70 Pro 5G मध्ये फ्लॅट AMOLED डिस्प्ले आहे जो फुल एचडी रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. हा फोन लॉन्च होण्यासाठी आणखी एक आठवडा शिल्लक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe