Ahmednagar News : कंटेनर – रिक्षाचा भीषण अपघात, एक ठार, एक गंभीर

Published on -

Ahmednagar News : पुणे महामार्गावर काल (दि.१२) सकाळी कंटेनरने माल वाहतूक रिक्षास पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून यात एक गंभीर जखमी झाला आहे.

अलिन उर्फ आलिम रफिक शेख (रा. अहमदनगर) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर इम्रान रफिक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व जखमी दोघे त्यांच्याजवळील मालवाहतूक तीन चाकी रिक्षा (क्र. एमएच १६ – एई २४२) ने अहमदनगर- पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने जात होते.

काल सकाळी नारायणगव्हाण शिवारातील नवले वस्ती जवळील हॉटेल समाधान जवळ पाठीमागून आलेल्या कंटेनर (क्रमांक सीजी ०७ बीआर ८३९७) ने रिक्षास पाठीमागुन जोराची धडक दिली.

यात गाडीतील दोघेही जबर जखमी झाले व यात अलिम रफिक शेख याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मृत पावला. तर इम्रान शेख गंभीर जखमी झाले. या घटनेतील अपघातास कारणीभूत आसलेला कंटेनर चालक जखमींना कुठलीही मदत न करता पळून गेला.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत प्राथमिक पंचनामा करत जखमी इम्रान शेख यास अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातातील वाहने बाजुला करत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली सुपा पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेला कंटेनर ताब्यात घेतला असून त्यावरील चालक फरार झाला आहे.

सुपा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप चौधरी पुढील तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News