OnePlus Smartphones : वनप्लसचा एक नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीचा हा फोन खूप खास असणार आहे, तसेच ग्राहकांना या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देखील अनुभवायला मिळणार आहेत. या फोनमध्ये काय खास असणार आहे पाहूया…
OnePlus Nord CE4 पुढील महिन्यात 1 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होणार आहे. हा फोन OnePlus Nord CE3 ची पुढील आवृत्ती असेल, Nord CE4 शी संबंधित माहिती Amazon आणि OnePlus वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. यावरून आगामी स्मार्टफोनच्या किती जबरदस्त असणार आहे हे समजते.
OnePlus Nord CE4 मध्ये पिल-आकाराचे कॅमेरा मॉड्यूल आणि एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, तसेच रिपोर्ट्सनुसार, नवीन फोन OnePlus दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर असणार आहे. सोबतच यामध्ये Adreno 720 GPU देखील दिले जाईल. याचा अर्थ डिव्हाइस कामगिरीच्या बाबतीत खूप खास असणार आहे. तसेच या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.
OnePlus Nord CE4 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबतीत कंपनी काहीतरी नवीन सादर करू शकते अशी अपेक्षा आहे. पूर्वीच्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, OnePlus Nord CE4 मध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. ज्यासह आणखी 8 एमपी लेन्स समर्थन म्हणून प्रदान केले जातील. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा असेल.
OnePlus Nord CE3 आणि गेल्या वर्षी लॉन्च झालेली त्याची Lite आवृत्ती भारतात खूप पसंतीस पडली होती. सणासुदीच्या काळात लाईट व्हर्जनची चांगली विक्री झाली होती. OnePlus Nord CE4 बद्दल वापरकर्त्यांचा काय प्रतिसाद आहे, हे काही दिवसांतच कळेल.