निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का? घड्याळऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना

Published on -

गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

या सुनावणीत न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळाच्या चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घेण्याचा पर्याय सुचवला आहे.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सिंघवी यांनी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेल्या घड्याळाच्या चिन्हावर आक्षेप घेतला आणि पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना नवे चिन्ह द्यायचे होते, मात्र त्यांनी आम्हाला नवे चिन्ह दिल्याचे कोर्टाला सांगितले.

अजित पवार गटाने घड्याळाव्यतिरिक्त अन्य कोणतेही चिन्ह वापरावे. घड्याळाचे चिन्ह आणि शरद पवार यांची ओळख यांचा अतूट संबंध आहे, असा युक्तिवाद सिंघवी यांनी कोर्टात केला. सिंघवी यांच्या युक्तिवादानंतर खंडपीठानेही हस्तक्षेप करत अजित पवार गटाला वेगळे चिन्ह वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

न्यायालयाने यावेळी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने उद्या समजा कोर्टाने हा आदेश स्थगित केला आणि निवडणूक मध्यावर असतील तर काय होईल असा सवाल न्या. कांत यांनी विचारत पुढे म्हटले की, आम्ही तुम्हाला एक सूचना देतो, तुम्ही घड्याळाच्या चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घ्या जेणेकरून आपण शांतपणे आणि तणावाशिवाय पुढे जाऊ शकाल.

तुम्ही तुमच्या चिन्हानेही निवडणूक लढवू शकता. आम्ही तुम्हाला हा पर्याय सुचवत आहोत. तुम्हाला तुमच्या आवडीचे चिन्ह घ्या, असं काही करता येतंय असा आम्ही पर्याय सूचवतो असे न्यायधीशांनी म्हटल्यानंतर आता चर्चाना उधाण आले आहे. आता सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या पर्यायावर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News