अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव फायनल झाले. त्यामुळे आता त्यांच्या नावाबाबत ज्या चर्चा सुरु होत्या त्याला फुलस्टॉप मिळाला आहे. परंतु आता चर्चा सुरु झाल्या आहेत त्या म्हणजे निलेश लंके यांच्या खासदारकीच्या उमेदवारीच्या. ते शरद पवार गटात जात खासदारकीचे तिकीट घेणार व विखे विरोधात लंके लढत होणार अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सूचक प्रतिक्रिया देत आ. निलेश लंके यांना टोला लगावला आहे. लंकेंचे खासदारकीचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केलाय. त्यांचे खासदारकीचे स्वप्न हे पूर्ण होणारे नाही. लंकेंचे खासदारकीचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. लंके हे महायुतीमधील एका मंत्र्यावर, स्थानिक राजकारणावर नाराज आहेत असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना विखे म्हणाले, कुणाच्या नाराजीला मी काहीच करू शकत नाही, लंके कशामुळे नाराज हे अजित दादांनाच माहीत अशी प्रतिक्रिया विखे यांनी दिली.
लंके विरोधात विखे अशीच फाईट रंगणार?
लोकसभेला लंके विरोधात विखे अशीच फाईट रंगणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटात जाण्याबाबत आ. लंके यांचे सर्व काही ठरले असू फक्त प्रवेश बाकी आहे, त्यानंतर लगेच त्यांना तिकीट जाहीर होईल अशी चर्चा सध्या रंगली आहे.