रेल्वेचे नगरमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-परळी मनमाड-नगर-दौंड मार्गाचे दुहेरीकरणामुळे नगरकरांची अनेक दिवसांची मागणी पुर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वखालील सरकारने देशभर रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी भरीव तरतुद केली आहे.

त्यांचाच एक भाग म्हणून नगर रेल्वे संदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने याबाबत समाधानी असल्याचे मुंबई झोन मेंबर सुदर्शन डुंगरवाल यांनी सांगितले. निंबळक-विळद-वांबोरी, काष्टी-विसापूर, अकोळनेर-सारोळा, पढेगांव-पुणतांबे, कान्हेगांव- येवला, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले.

नगरमध्ये आयोजित या कार्यक्रमास सोलापुर डिव्हीजनचे सिनिअर डिईएन मोहंमद फैझ, एसआर एडीईएन शरदकुमार त्रिवेदी, एक्झि. इंजि. संदिप सिन्हा, इंजि. डि.बी. पाटील, डॉ. आनंद वाघमारे, नगरचे स्टेशन प्रबंधक एन.पी.तोमर, सीसीआय शुभम थोरात, पी.व्ही. आव्हाड, मुंबई झोन मेंबर सुदर्शन डुंगरवाल, अनिल सबलोक, वसंत लोढा आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोहंमद फैझ यांनी मनमाड-दौड सेक्शनमधील दुहेरीकरणाचा आणि महाराष्ट्रातील अनेक नवीन स्टेशन, वंदे भारत ट्रेन आदिंचे लोकार्पण झाल्याने महाराष्ट्रातील रेल्वे जाळे अधिक व्यापक होऊन गती मिळाली असल्याचे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe