Ahmednagar News : आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत निवडणूक आयोग अजूनही आचारसंहिता लागू करीत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे प्रतिपाद शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केले.
काल गुरुवारी (दि.१४) उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमासमोर बोलताना ते म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीचे घटक असून लोकसभा निवडणूकीमध्ये आमच्या अधिकृत उमेदवारांना कामाला लागा, असे आदेशही दिले आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसून महायुतीला धडा शिकविणार असून सर्वात जास्त खासदार इंडिया आघाडीचे निवडून येणार, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते खासदार विनायक राऊत यांच्या स्वागतासाठी हजर होते. तर लोकसभा निवडणूक व संभाव्य आदित्य ठाकरे यांच्या शिर्डीतील मेळाव्यासाठी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी रावसाहेब खेवरे,
नाना बावके, संजय शिंदे, अमोल गायके, सचिन चौगुले, सोमनाथ गोरे, अमृत गायके, सचिन कोते, सुनील परदेशी, किरण जपे, सचिन बडदे, अनिल भांगरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.