Maharashtra News : महाराष्ट्रातच अध्यात्माची क्रांती झाली आहे. त्या राज्यात आपण राहतो, तेथे सत्ययुगात ब्रम्हगिरीपर्वत, नाशिक येथे युगाची आदला-बदल होण्याची क्रांती गौतमऋषीच्या आश्रमात झाल्याचे प्रतिपादन गुलाब महाराज खालकर यांनी केले.
येथील मुक्ताई ज्ञानपीठ पंचदिवशीच किर्तन मोहोत्सावात आयोजित किर्तनात काल गुरूवारी (दि.१४) ते बोलत होते. पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत रामानंदगिरी महाराज यांच्या प्रेरेणेने दरवर्षी पंचदिवशीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
काल प्रथम दिवशीय किर्तन जुन्नर येथील स्वामी मैनानंद आश्रमाचे गुलाब महाराज खालकर यांनी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग कसे निर्माण झाले आहे. याचे पौराणिक दाखले देऊन निरुपन करताना ते म्हणाले,
महाराष्ट्रातच युग रचना बदल क्रांती ब्रम्हदेवाने मुलीच्या आर्त हाकेकरीता कशी केली. हे स्पष्ट करताना ब्रम्हदेव, मुलगी आहिल्या, गौतम ऋषी यांची कथा त्यांनी वर्णीली. त्यांच्या स्पष्टीकरणाकरिता रामकृष्ण अवतारातील विविध दाखले, प्रमाण, उदाहरणासह देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी मुक्ताई ज्ञानपिठाचे महंत रामानंदगिरी महाराज, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष भास्करराव चव्हाण, रविशंकर जेजूरकर, आबासाहेब डोखे, विष्णू डोखे, लक्ष्मणराव शेरकर, बाळासाहेब सांबारे, दादासाहेब पिंगळे,
प्रा. अबांदास इंगळे, विलासबाबा धनवटे तसेच हार्मोनियम वादक ताराचंद पेटकर, गायनाचार्य राविदास जगदाळे, हरीभाऊ गरुड, मृदूंगाचार्य किरण टिक्कल व विविध गावातील टाळकरी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.