NHM PCMC Bharti 2024 : पुण्यातील तरुणांसाठी नोकरीची मोठी भरती! आताच करा अर्ज, जाणून घ्या…

Content Team
Published:
NHM PCMC Bharti 2024

NHM PCMC Bharti 2024 : पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत ”स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी. आरोग्य अभ्यागत” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

स्त्रीरोगतज्ज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस व स्त्रीरोग विषयातील पदवी (एम.डी./एम.एस. डी.एन.बी.) किंवा पदविका

बालरोग : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी./जी.सी.एच./डी.एन.बी (बालरोग) पदवी परिक्षा उत्तीर्ण

भूलतज्ज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. डी.एन.बी.(अॅनेस्थिशिया) पदवी.

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. डी.एन.बी.

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) : एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण आवश्यक.

स्टाफ नर्स : 12 वी उत्तीर्ण आवश्यक.

नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम) : 10 वी उत्तीर्ण आवश्यक

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एस.सी. ही पदवी आवश्यक.

टी.बी. आरोग्य अभ्यागत : एम.एस.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष येथे. आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया 15 मार्च 2024 पासून सुरु झाली असून, उमेदवारांनी अर्ज 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास www.pcmcindia.gov.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 असून, देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे देखील आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe