Ahmednagar News : जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी आशा गजराने तारकपूर बसस्थानकाचा आवार निनादून गेला होता. निमित्त होते तारकपूर बसस्थानकातून सजून-धजून अयोध्येकडे रवाना होत असलेल्या हिरकणी बसच्या अयोध्या प्रस्थानाचे.
भाविकांना घेऊन तारकपूर आगाराची ही हिरकणी शनिवारी अयोध्याकडे रवाना झाली. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ आणि राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक योगेश जाधव यांनी भाविकांना सुखकर अयोध्या वारीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे, विभागीय वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे, विभागीय भांडार अधिकारी संकेत राजहंस, जेष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज, विभागीय लेखाधिकारी वृंदा कंगले, सांख्यिकी अधिकारी मयुरी दिकोंडा, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नितीन गटणे,
तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी, सहायक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर, अभिजीत आघाव, चंद्रकांत खेमनर, सुरेंद्र कंठाळे, गोविंद पेडियार, किशोर केरूळकर यांच्यासह रापमं अधिकारी कर्मचारी, अयोध्या यात्रासाठी निघालेल्या प्रवाशांचे नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते.
बसच्या समोर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. या बसची आकर्षक सजावट एसटी प्रेमी ग्रुपच्या क्षितिज कोतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. यावेळी प्रभुरामचंद्रांच्या प्रतिमेची आणि हिरकणी बसची विधीवत पूजा नगर विभागाच्या नियंत्रक मनीषा सपकाळ, लेखापरीक्षक योगेश जाधव, तारकपूर आगाराचे व्यवस्थापक अभिजित चौधरी,
अयोध्या यात्रेच्या दरम्यान बसमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन येणे, बसचे चालक प्रदीप वाघ, गीताराम जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक अविनाश कलापुरे म्हणाले, विभाग नियंत्रक सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील भाविकांना अयोध्या यात्रेसाठी बस उपलब्ध केल्या जातील असे सांगत प्रवासात खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.