Department of Urban Development : नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
वरील भरती अंतर्गत ”सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी व सेवानिवृत्त निम्नश्रेणी लघुलेखक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर 21 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
राज्य शासनाच्या मंत्रालयीन सेवेतून सेवानिवृत्त झालेले सहायक कक्ष अधिकारी व निम्नश्रेणी लघुलेखक असावेत. तसेच नगर विकास विभागातील कामकाजाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 65 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील पदांसाठी अर्ज “उप सचिव (आस्थापना), दालन क्र.१, मुख्य इमारत (सचिवांची दालने), ४ था मजला, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२” या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास https://urban.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने 21 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज करताना अर्ज हा पूर्ण भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अर्जासह आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.