Loksabha Election : भारतीय निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होईल आणि 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे.
आपल्या महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवार फायनल केले जात आहेत.

भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत आपल्या अधिकृत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. यातील दुसऱ्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
दुसऱ्या राजकीय पक्षांनी मात्र अजूनही महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे फायनल केलेली नाहीत. अशातच, मात्र महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 16 उमेदवार फायनल झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
अजून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार उबाठा शिवसेना पक्षाचे 16 उमेदवार अंतिम झाले आहेत.
यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी शक्यता आहे. दरम्यान आता आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 16 संभाव्य उमेदवारांची माहिती पाहणार आहोत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ
- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर
- ईशान्य मुंबई मतदार संघातून संजय दिना पाटील
- दक्षिण मुंबई मतदार संघातून अरविंद सावंत
- दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून अनिल देसाई
- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे
- बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडकर
- यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख
- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर
- परभणी लोकसभा मतदारसंघातून बंडु जाधव
- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे
- नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजय करंजकर
- ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे
- रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गिते
- हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश अष्टीकर
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत
- सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहास पाटील