Ahmednagar News : तरुणाचा मृतदेह सापडला ! नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल दिनांक १७ मार्च रोजी रात्री पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की या घटनेतील मयत मयत प्रकाश ऊर्फ मल्हारी छबू पवार (वय ३५ वर्षे, रा. बारागाव नांदूर, राहुरी) या चालक असलेल्या तरुणाने रविवारी सायंकाळी त्याच्या काही मित्रांबरोबर राहुरी येथे जेवण केले. नंतर तो तेथून निघून गेला.

अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाच्या खाली छिन्नविछिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आला. चालक गणेश वराळे यांच्या रुग्णवाहीकेतून मृतदेह राहुरी येथे आणण्यात आला.

काल दिनांक १८ मार्च २०२४ रोजी शवविच्छेदनाच्या ठिकाणी त्याच्या नातेवाईक व मित्र मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याप्रसंगी नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड, हवालदार अंकुश भोसले, भाऊसाहेब शिरसाट, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, गोवर्धन कदम यांनी यावेळी भेट दिली.

यावेळी पोलिस पथकाने चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुपारी उशीरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरु होते. मात्र नातेवाईकांनी प्रकाशचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलीस प्रशासनाकडून त्या दृष्टीने चौकशी व तपास सुरू आहे.

हे पण वाचा

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe