Grah Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा हे नवग्रह आपली चाल बदलत असतात तेव्हा-तेव्हा 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. ग्रहांच्या या राशी बदलादरम्यान ग्रहांचा संयोग देखील तयार होतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. जे सर्व राशींना लाभ देतात.
अशातच 18 वर्षांनंतर शुक्र, राहू आणि सूर्य यांचा संयोग तयार होणार आहे. शुक्र 31 मार्च रोजी गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. जिथे आधीच मायावी ग्रह राहू आणि सूर्य उपस्थित आहेत. ग्रहांच्या या संयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. तीन मोठ्या ग्रहांनी बनलेला हा त्रिग्रही योग काही ठराविक राशींसाठी शुभ राहील, कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग खूप शुभ मानला जात आहे. या काळात तुम्हाला अनेक लाभ मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. बरेच दिवस तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. गुंतवणुकीतून लाभ होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य, राहू आणि शुक्र यांचा योग शुभ राहील. या लोकांना व्यवसाय आणि करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग उत्तम मानला जात आहे. या काळात लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तसेच संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. आदर वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पगार वाढेल. पदोन्नतीचा लाभ मिळेल.