Apple : सॅमसंगची सद्दी आता संपणार! ॲपल आणतोय नवीन फोल्डेबल फोन!

Ahmednagarlive24 office
Published:
Apple

Apple : सॅमसंगला टक्कर देण्यासाठी ॲपल नवीन फोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. कपंनी लवकरच फोल्डेबल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनी येत्या 3 वर्षात हे उपकरण लॉन्च करू शकते.

ज्यामध्ये कपंनी iPhone SE 4, foldable iPhone यासह अनेक चांगली उपकरणे सादर करणार आहे. मागील वर्षी Apple ने iPhone 15 सिरीज तसेच वॉच सिरीज 9 आणि व्हिजन प्रो सारखी उपकरणे बाजारात लॉन्च केली होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका टिपस्टरने Apple चे पुढील 3 वर्षांचे नियोजन लीक केले आहे. टिपस्टरनुसार, अमेरिकन कंपनी व्हिजन प्रो व्हीआर हेडसेटसह फोल्डेबल आयपॅड तसेच OLED डिस्प्ले, iPhone SE 4, फोल्डेबल iPhone, OLED पॅनेलसह MacBook यासह एक iPad लॉन्च करू शकते.

iPhone SE 4

आयफोन SE 4 बद्दल अनेक दिवसांपासून लीक रिपोर्ट समोर येत आहेत. ॲपलचा हा स्वस्त iPhone 2024 मध्ये लॉन्च होईल असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर असे अनेक रिपोर्ट्स देखील समोर आले आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की हा स्वस्त आयफोन पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केला जाऊ शकतो. या iPhone SE 4 मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. तसेच फोनच्या मागील बाजूस 48MP मुख्य कॅमेरा दिला जाईल.

Apple Vision Pro VR हेडसेट नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. Apple लवकरच त्याची स्वस्त आवृत्ती लॉन्च करू शकते. त्याचबरोबर कंपनीच्या फोल्डेबल आयफोनबाबत गेल्या अनेक वर्षांपासून लीक्स समोर येत आहेत. या नवीन लीक झालेल्या रिपोर्टनुसार, ॲपलचा हा फोल्डेबल आयफोन 2026 मध्ये लॉन्च होईल. यात 8-इंचाची मुख्य फोल्डेबल स्क्रीन आणि 6-इंचाची कव्हर स्क्रीन असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe