Renukamata Multistate Society : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे, या भरती अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत, तसेच येथे कधी पर्यंत अर्ज करू शकता, जाणून घ्या…
वरील भरतीअंतर्गत “शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 मार्च 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
या जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी मिरजगाव, मुंजाबा चौक, भुई गल्ली, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अ.नगर-४१४४०१ या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत आपले अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.renukamatamultistate.com/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखतद्वारे होणार असून, उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
-उमेदवारांनी 27 मार्च 2024 रोजी मुलाखतीस हजर राहायचे आहे.
-अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच येताना भरती जाहिरात सविस्तर वाचावी.